Skip to main content

Posts

कर्माधिकारी शनिदेव मालिकेतील निवडक प्रसंग: भाग 1 (मूषक वाहन)

कर्माधिकारी शनिदेव या शेमारू टीव्हीवर सुरू असलेल्या अतिशय उत्तम मालिकेत देवर्षी नारद हे काही कारणास्तव शनि देवाबद्दल मनातून प्रचंड आकस आणि द्वेष बाळगून असतात. अशा या देवर्षी नारद यांना शनि देवाची कथा पवनपुत्र हनुमान सांगत असतो.  शनिदेव आणि यम या दोन्ही भावांना त्यांचे पिता सूर्यदेव जेव्हा स्वतःचे वाहन मिळवायला सांगतात त्यावेळीची गोष्ट सांगताना नारदाला देवांच्या वाहनांचा प्रतीकात्मक अर्थ सांगताना हनुमान गणेशाचे वाहन मूषक यांचे उदाहरण देतो.  हनुमान म्हणतो, "मूषक हा प्राणी समोर आलेली चांगली वस्तू असो अथवा वाईट वस्तू असो, तो ती कुरतडणारच. नारद म्हणतात,"हा तर त्याचा मूळ स्वभावच आहे तर त्याचे काय, हनुमानजी?" हनुमान म्हणतो, "पुढे ऐका नारद मुनी. काही लोक असे असतात त्यांना प्रत्येक बऱ्या वाईट घटनेत आणि व्यक्तीत दोषच काढायची सवय असते. त्यांना सगळे जग आणि प्रत्येक व्यक्ती वाईटच दिसतात. अशा लोकांचे प्रतीक म्हणजे मूषक. आणि अशा मुषकाला गणेश नियंत्रित करून त्यांच्यावर बसतो. याचा अर्थ असा गणेशाची उपासना केल्याने बुद्धी स्थिर होते, सद्सदविवेक बुद्धीने मनुष्य विचार करतो आणि मूषकाप्रम

कुठे गेले हे पदार्थ?

सणासुदीला आवर्जून करण्यात येणारे पदार्थ काळाच्या ओघात विस्मृतीत जात आहेत की काय, अशी स्थिती आजच्या व्यग्र जीवनशैलीत निर्माण झाली आहे. ‘कुठे गेले हे पदार्थ?’ या शीर्षकाखाली असे पदार्थ आम्हाला लिहून पाठवण्याचे आवाहन आम्ही वाचकांना केले नि त्याला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. हे पदार्थ मागवण्यामागे केवळ या पदार्थांची रेसिपी शेअर करणे हा एकमेव उद्देश नव्हता, तर घरोघरी केल्या जाणाऱ्या पदार्थांसोबत प्रत्येकाची कुठली ना कुठली आठवण जडलेली असते. कुणाला आजीच्या हातच्या पुरणपोळ्यांची चव आठवत असते, तर कुणाला शेजारच्या मावशींनी आवर्जून पाठवलेल्या पातोळ्या आठवत असतात.. हे पदार्थ आम्हाला लिहून पाठवताना नि ते वाचताना वाचकांच्या या साऱ्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळाला असेल! - पाककृती ग्रुप 🥗उकडपेंडी🥗 साहित्य- एक वाटी भरडसार दळलेली कणीक, अर्धी वाटी चिंचेचे पाणी, चिरलेली कोथिंबीर, ओले खोबरे, जिरे, लाल तिखट, मीठ, एक मोठा डाव तेलाची हिंग, मोहरी, हळद घालून केलेली फोडणी. कृती- कणीक कढईत खमंग भाजून घ्यावी. फोडणी करून त्यात कणीक घालून चांगले परतावे. मीठ, तिखट, जिरे घालून परत एकदा परतावे. चिंचेचे पाणी थोडे-

सकारात्मक भाषा

सकारात्मक भाषेमध्ये केवळ सकारात्मक विचार आणि बोलणेच नाही तर शरीराचे सकारात्मक हावभाव, वागणूक आणि सकारात्मक लेखन देखील समाविष्ट आहे. एकदा तुम्ही सकारात्मक विचार करण्याची आणि प्रत्येक परिस्थितीची उजळ बाजू पाहण्याची सवय लावली की, तुम्ही बोललेले शब्द आणि वाक्य आणि तुमची देहबोली आपोआप सकारात्मक बनते. याचा अर्थ तुम्ही कोणतीही भाषा बोला आणि लिहा, पण ती स्वत:च्या आणि लोकांच्या भल्यासाठी सकारात्मकतेने युक्त असावी. तुम्हाला माहिती आहेच की, तुम्ही विश्वाला जे काही देता ते तुमच्याकडे अनेक पटीने परत येते. मग जगाला सकारात्मक स्पंदने का देत नाहीत? हे तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रांना लागू होते, मग ते कौटुंबिक जीवन असो, सामाजिक जीवन असो किंवा व्यावसायिक जीवन असो.  शेवटी, आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्यावर आपण कसे वागतो (शरीराची भाषा आणि हावभाव) आणि बोलतो आणि लिहितो हे ठरते. आपला चेहरा आपल्या भावनांचा आरसा असतो. प्रत्येक परिस्थितीची सकारात्मक बाजू पाहण्यासाठी आणि सकारात्मक विचार करण्यासाठी तुमच्या मेंदूला प्रशिक्षण देऊन तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकता. आपण सर्वजण जी भाषा वापरतो आणि जे वर्तन

आपली कर्मे, कर्माची फळे व प्रारब्ध भोग (श्रीपाद रानडे, पुणे)

कर्मविपाक म्हणजे तुम्ही केलेल्या कृत्यांची, कर्मांची फळे. ही तुम्हाला भोगावीच लागतात. उदाहरणार्थ: मी चोरी केली, मला पकडले व त्याबद्दल शिक्षा झाली. मला कर्माचे फळ मिळाले; संपले! पण मी चोरी केली आणि या जन्मात सापडलो नाही, मेलो. तरी ते फळ चुकत नाही. मला पुढील जन्मात त्याचे फळ भोगावे लागते. त्यातून सुटका नाही. प्रत्यक्ष परमेश्वरही त्यात ढवळाढवळ करत नाही. याचा अर्थ तुमचा पुनर्जन्म होतो कारण हिशोब चुकता केल्याशिवाय तुमची सुटका नाही. चांगल्या कर्माची शुभ फळे व वाईट कर्माची अशुभ. कर्माच्या जातीप्रमाणे (Gradation) फळाची जात असते. हा झाला कर्म सिद्धांत! काही कर्मे मागील जन्मातील असतात. त्यांची फळे अजून भोगावयास सुरवात करावयाची असते. त्या पैकी काहींची सुरवात सुरू झालेली असते. काही चालू जन्मातील असतात. यांना निरनिराळी नावे दिली आहेत. (१) संचित: कोण्याही मनुष्याने सांप्रत (आताच्या क्षणापर्यंत) केलेले कर्म म्हणजे संचित. ते मागच्या जन्मातील व या जन्मातील आतापर्यंत केलेया कर्मांची बेरीज. याला अदृष्ट किंवा अपूर्व असेही म्हणतात. अदृष्ट म्हणावयाचे कारण करतेवेळी कर्म दृश्य असते पण नंतर ते केवळ परिणाम रूपा