Skip to main content

नागपुरी वडाभात रेसिपी






वड्याचे साहित्य:

१/२ कप चना डाळ, २-३ चमचे मटकी डाळ, २ चमचे उडदाची डाळ, २ चमचे तूर डाळ, २ चमचे मसूर डाळ, २ चमचे मुंग डाळ, ७-८ लसणाच्या पाकळ्या, हळद, ७-८ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे, मीठ चवीनुसार

वड्याची कृती:
सगळ्या डाळी एकत्र धुवून ३ तास भिजत घालाव्यात. ३ तासाने पाणी काढून त्यात हिरव्या मिरच्या, लसुण पाकळ्या , कोथिंबीर व मिठ घालून मिक्सरला जाडसर वाटून घ्यावे. वाटताना पाणी घालू नये. वरील मिश्रणात जिरं घालून घ्यावे. एका कढईत तेल गरम करून वरील मिश्रणाचे वडे करून घ्यावे.
भाताचे साहित्य:
१ कप बासमती तांदूळ, दीड कप पाणी, मीठ चवीनुसार

भाताची कृती:
तांदूळ धुवून घ्यावे. पाणी व मीठ घालून कुकरला ३ शिट्या काढाव्यात.

फोडणीचे साहित्य:
तेल, १/२ चमचा जिरे, १/२ चमचा मोहरी, एक चिमूट हिंग, २ आख्या लाल मिरच्या

फोडणीची कृती:
एका छोटया कढईत फोडणीसाठी तेल गरम करावे त्यात मोहरी घालावी ती तडतडली की हिंग कढीपत्ता व जिरे घालावे. थोडसे भाजले की लाल मिरच्या तोडून घालाव्यात. मिरच्या लालसर झाल्या की गॅस बंद करावा.

वाढणीसाठी:
ताटात आधी भात घ्यावा त्यावर ३-४ वडे घालावे. हे वडे कुस्करून भातात घालावे व वरून तयार फोडणी घालावी. खातांना लाल मिरची आणि वडे भातात छान कुस्करावे आणि खायला घ्यावे.