Skip to main content

दैवी कृपेचा संबंध पंचम आणि नवम् स्थानांशी



लग्न कुंडलीतील पंचम स्थानावरून देवाविषयीचे प्रेम, श्रद्धा याचा विचार केला जातो आणि नवम् स्थान धर्मस्थान आहे पंचम व नवम दोन्ही मिळून दैवी शक्ती आणि ईश्वरी कृपेचा विचार होत असतो. पाहूया याबाबतचे विचार.

1. लग्नेश उच्चीचा असेल व त्यावर शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर.

2. दुसऱ्या स्थानाचा स्वामी उच्चीचा असेल आणि उच्चीचा गुरु असेल व त्याची दृष्टी द्वितीयेशावर पडत असेल तर.

3. द्वितीयेश उच्च असून पंचम, नवम किंवा एकादश स्थानात असेल आणि लग्नेश बलवान असून त्याच्या सोबत असेल तसेच द्वितीयेश ज्या स्थानात बसला असेल, त्याचा स्वामी केंद्रात असेल तर.

4. पंचम स्थानात जर रवी, मंगळ किंवा गुरु असतील किंवा या स्थानावर या ग्रहांची दृष्टी असेल तर.

5. दशमेश जर बुध असेल व त्यावर शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर.

6. नवमेश उच्चीचा असेल आणि त्यावर गुरु शुक्र चंद्र किंवा बुधाची दृष्टी असेल तर.

7. लग्नस्थानावर व लग्नेशावर नवमेशाची दृष्टी असल्यावर.

8. नवमेश चतुर्थ भावात असल्यास.

9. लग्नेश दशम स्थानात व दशमेश नवंस्थानात आणि त्यावर शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर.

10. कुंडलीत शनि व मंडळाच्या मध्ये सर्व ग्रह असल्यास.

11. कुंडलीत चंद्र आणि गुरूच्या मध्ये सर्व ग्रह असल्यास.