Skip to main content

शुक्राचे महत्व (लेखक: गजानन परब)


साहित्य, संगीत, सभ्यता, सुंदरता, संतान, सुख, शांती, धन, एश्वर्य, वाहन, विवाह आणि प्रेमाचे प्रमुख कारक शुक्र ग्रह आहेत, या भौतिक जगातील सर्व सुख देऊ शकतो तो आहे शुक्र. 

आपल्या आकाश गंगेतील सर्वात चमकदार ग्रह शुक्र! 

म्हणून ह्या जगात जी काही चमक आणि सौन्दर्य आहे ते या शुक्राच्या कारणाने आहे. आपल्या जीवनात जे काही भोग, विलास, आराम आणि आनंद आहे त्याचा प्रमुख कारक ग्रह शुक्र आहे, ‘शुक्र है तो सब कुछ शुक्र है’. ह्याला आपण "उत्सवाची सुरुवात (बिगिनिंग ऑफ फेस्टिविटी)" म्हणू शकतो, म्हणूनच जास्त करून नवीन फिल्म्स, पिक्चर शुक्रवारीच रिलीज होताना दिसतात!

शुक्र विवाह आणि प्रेमाचा कारक आहे म्हणूनच, विवाह विधी नंतर नववधूला शुक्राचा तारा आकाशात दाखवला जातो, कारण सौभाग्य कारक ग्रह शुक्राचा आशीर्वाद मिळेल आणि वैवाहिक जीवन सुखी होईल! म्हणूनच संसारीक सुखासाठी शुक्र सर्वात महत्वपूर्ण ग्रह आहे. 

ज्यावेळी शुक्र गोचर मध्ये अस्त होतो, त्यावेळी विवाह कार्य, नवीन घर, नवीन जमीन, नवीन वाहन घेणे टाळण्यास सांगितले आहे.  

महर्षि पाराशर शुक्र आणि गुरु या दोन्ही ग्रहांना फळ देण्यास समान मानतात, कारण गुरुप्रमाणेच शुक्रामध्ये पण दोष हरण्याची क्षमता आहे. 

शुक्र एवढा महत्वपूर्ण ग्रह आहे की भगवान श्री कृष्ण गीतेच्या एका अध्यायमध्ये सांगतात: वृश्नियो मध्ये मी वासुदेव आहे, पांडवात मी धनंजय आहे, ऋषीमुनीमध्ये मी व्यास आहे आणि कविमध्ये मी वृष्णाकवि आहे! वृष्णा हे शुक्राचार्यांचेच एक नाव आहे! कवि म्हणजेच ज्ञानी. तर शुक्र एवढा महत्वपूर्ण, शक्तिशाली आणि शुभ आहे, की भगवान ह्याला आपले स्वरूप म्हणतात, आपली विभूति म्हणतात.  

कवि म्हणजे साहित्य, संगीताचे संपूर्ण ज्ञान शुक्राजवळ आहे, पौराणिक कथेत शुक्राच्या आईचे नाव काव्यमाता होते, यावरून शुक्र हे नाव पडल्याचे उल्लेख आहे! ह्यांचा जन्म स्वाति नक्षत्र आणि तूळ राशीत झाल्याने त्यांची जन्म राशी तूळ आणि राहू नक्षत्र स्वामी असल्याने राहू मित्र मानला आहे. अंक ज्योतिष मध्ये 6 नंबरचे स्वामी मानले आहेत!

ज्योतिषीय महत्व- 

गुरु- शुक्र दोन्ही नैसर्गिक शुभ ग्रह आहे, दोन्ही ग्रह अशुभता नष्ट करतात, आणि शुभतेत वृद्धी करतात. गुरु जेथे ज्ञान अधिक देतात तेथे शुक्र ज्ञान आणि धन दोन्ही देतात. पण शुक्र दैत्यगुरू झाल्याने त्यांचे ध्यान ज्ञानपक्ष पेक्षा धन पक्षाकडे जास्त गेले आहे, त्यामुळेच अधिकार प्राप्तीकडे कल आणि महत्वकांक्षा जास्त देतात, म्हणून शुक्रप्रभावित जातक अधिकार प्राप्तीसाठी सांसारिक सुखाकडे विशेष ओढ असते. 

आपण कसे ओळखाल की शुक्र प्रभावित जातक कोण? 

अंकशास्त्रनुसार आपला जन्म 6, 15, आणि 24 तारीखला जन्म असेल, त्यांचा मुलांक 6 येतो ते शुक्र प्रभावीत! व्रुषभ राशी, तुला राशी, या व्यतिरिक्त शुक्र मीन राशीत आपला प्रभाव देतो तसेच कुंडलीत 1,2,4,5,7,9,10,11,12 या भावात पण शुक्र खूप चांगले परिणाम देतो. 

केतूच्या व्यतिरिक्त शुक्र एकमात्र असा ग्रह आहे जो 12 व्या भावात पण अत्यंत शुभ फळ देतो. मग लग्न राशि शुक्राची असेल तरीही जातक शुक्र प्रभावित असतो, त्याच बरोबर शुक्र, चंद्र युती, नवपंचम योग. आणि शुक्र नक्षत्र असेल तर असे जातक शुक्र प्रभावित असतात. 

शुक्र वृषभ, तुला राशीतून केंद्रस्थानी असेल तर मालव्य नावाचा महापुरुष राजयोग बनवतो, महर्षि पाराशर धन देण्यास ह्याला सर्वात मोठा राजयोग मानतात!

शुक्र संसारीक महत्व-

कालपुरुष कुंडलीत शुक्र दुसर्‍या आणि सातव्या भावाचे नैसर्गिक स्वामी मानले आहेत.  

कालपुरुष कुंडलीत दुसर्‍या स्थानात वृषभ राशी येते, आणि सातव्या घरात तुला राशी येते. 

सातव्या स्थानातून आपण जीवनसाथी, व्यापार आणि आपल्या सामाजिक दर्जाचा विचार करतो. त्यामुळे सफल वैवाहिक जीवनासाठी, धन आणि प्रसिद्धी या साठी शुक्र सर्वात महत्वपूर्ण ग्रह असतो. 

आणि सातवा भाव अजून काय दर्शवतो? आपले ‘प्रायव्हेट बॉडी पार्ट’! तर शुक्रमध्ये ही पावर आहे. ट्रान्सफॉर्म करण्याची, म्हणजे आपण जे तोंडाने जे अन्न खातो ते शेवटी धातूच्या रूपात (आपल्या शुक्रच्या रूपात) म्हणजे विर्याच्या रूपात परिवर्तीत होते, म्हणून शुक्र जीवन आहे. 

त्याच बरोबर कुंडलीतील द्वितीय स्थान हे वाणी म्हणजे बोलणे, तसेच आपली इमेज आणि खानपान दर्शवतो. 

महर्षि पराशर शुक्राला शेवटच्या म्हणजे 12 व्या घरात,  12 व्या राशीत जास्त शुभ का मानतात? 

तर शुक्राला अंतिम रूप देण्यात सर्वात जास्त महारथ प्राप्त आहे. म्हणूनच शुक्राला कलाकार, कवि म्हटलं आहे, प्राचीन ग्रंथ सांगतात की शुक्रात कुटल्याही गोष्टीस सर्वोतम रूप देण्याची क्षमता आहे, म्हणून कलेचे स्वाभाविक स्वामी मानले आहेत! एवढे शुभ आहेत शुक्र!

जर आपल्या कुंडलीत शुक्र चांगला असेल तर आपण आपल्या जीवनात भोग नक्कीच कराल, चांगले वाहन सुख, घरदार, जीवन साथी, धनी आणि सुखी जीवन या सर्वांचे कारक शुक्र बनतो.  

प्रत्येक प्रकारच्या इंद्रियांचे स्वामी आहेत, स्मेल, साईट, टच, टेस्ट, हिअर, लुक ह्या सर्व विषयांचे कारक पण शुक्र बनतात. त्याच बरोबर शुक्राला "अभिव्यक्ती स्वामी" म्हणजे "लॉर्ड ऑफ एक्सप्रेशन" म्हणतात, म्हणूनच शुक्राला (Venus) इंग्रजीत प्रेमाची देवी म्हटले आहे! 

वेगवेगळ्या प्रकारचे संगीत, नाट्य, कला, कविता म्हणजे शुक्र! 

शुक्र प्रभावित जातक वरील सर्व व्यवसायात असतात- म्हणजे फिल्म, आर्ट आणि क्राफ्ट, मीडिया, फॅशन, फूड, फायनान्स, बिझनेस, ट्रान्सपोट, एडवाईजरी, एडव्हरटायजिंग, कन्सल्टन्सी या विषयात करिअर बनवतात.  म्हणजे नोकरी आणि व्यापारचे महत्वपूर्ण कारक बनतात शुक्र!

शुक्राचे आध्यात्मिक महत्व-

शुक्र इच्छा आहे! इच्छेपासूनच सृष्टी निर्माण होते! सृष्टी निर्माण कोण करतात? ब्रम्हदेव! म्हणजे शुक्राचे देवता कोण आहेत ब्रम्हदेव! जसे ब्रम्हा सृष्टी निर्माण करतात, त्याच प्रमाणे प्रत्येक जीव पण आपल्या आतील ब्रम्हाच्या शक्तीने सृष्टी तयार करतो! फरक फक्त हाच आहे की ब्रम्हा मानसी सृष्टी करतात आणि जीव मैथुनी सृष्टी निर्माण करतो! शुक्राचे फूल पण कमळ आणि ब्रम्हाचे आसन पण कमळ आहे! कमळ हे ज्ञानाचे प्रतीक मानले आहे! 

शुक्राची देवी आहे जगदंबा आणि जगदंबा कोण आहे? मूळ प्रकृती आहे, ईश्वराची शक्ति आहे! 

ईश्वराला सृष्टी निर्माण करण्याची ज्यावेळी इच्छा होते, त्यावेळी प्रकृतीला किंवा शक्तीला सृष्टी निर्माण करण्यास सांगतात, म्हणून शुक्रास संतान सृष्टी करण्याचा अधिकार दिला आहे!

भगवान जर कमलनयन आहेत तर जगदंबा कमला आहे, तर कमळामुळे विष्णु आणि लक्ष्मीचा संबंध बनतो. आपणाला आमहित असेलच की शुक्राची दोन नावे आहेत, वीर्य आणि रज! यालाच रजस आणि रेतस पण म्हटले आहे! रजस यानेच राजसीक म्हणजेच सांसारिक हा शब्द बनला आहे! 

ज्यावेळी शुक्र राजसीक बनतो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये त्याची गती अधोमुखी होते, म्हणजे खालच्या भागाकडे चालतो, त्यावेळी संतान उत्पत्तीचे कार्य करतो. 

पण जेव्हा शुक्र रेतस रूपात चालतो त्यवेळी तो सात्विक बनतो, त्यावेळी तो उर्धोमुखी चालतो म्हणजे शरीरात वरच्या भागात चालतो, त्यावेळी तो योगी रूपात प्रकट होतो! या स्वरुपात शुक्र ब्रम्हाचे "ज्ञान अंग" दर्शवतो, हे शुक्राचे आध्यात्मिक रूप आहे!

ज्ञानाचे दोन ग्रह आहेत सूर्य आणि गुरु! 

शुक्र सूर्यापासून खगोलीय दृष्टीने हे  46 अंशा पेक्षा दूर जात नाही! 

म्हणजे शुक्र, बुध सूर्यापासून 2 राशी दूर जात नाही आणि गुरुच्या राशीत शुक्र उच्च होतात! 

म्हणजे शुक्र, गुरु आणी रवी  ह्यांच्या जास्त जवळ राहतात म्हणजे शुक्राचा ज्ञानाशी पण सखोल संबंध आहे, म्हणजे शुक्र केवळ संसार नाही आहे, संसार पण आहे आणि आसार पण आहे!!

संदर्भ- फलदिपीका, पराशर.