Skip to main content

चिरोटे रेसिपी


साहित्य:

• एक वाटी रवा

• एक वाटी मैदा

• तळण्यासाठी तेल

• एक वाटी दूध

• अर्धा वाटी तूप

• बेकिंग सोडा

• साखर दोन वाट्या 


कृती:

1. प्रथम रवा मैदा चाळून एकत्र करून घ्यावा.

2. त्यात वाटीभर तूप कडकडीत गरम करून टाकावे. मग त्यात चिमूटभर बेकिंग सोडा टाकावा.

3. नंतर ते मिश्रण हाताने चांगले चोळावे.

4. मग कणिक भिजवतो तशी कणिक दूध टाकून भिजवावी.

5. तयार झालेला गोळा दोन तास झाकून ठेवावा.

6. त्यानंतर त्याच्या पातळ पोळ्या लाटाव्या.

7. त्याला तूप लावून त्याचा रोल करावा. मग चाकूने गोल गोल कापावे. वाटल्यास थोडे लाटून पुरीसारखे मंद आचेवर तळावे. हे चिरोटे तयार झालेत.

8. दोन वाटी साखरेत भिजेल एवढे पाणी टाकून त्याचा पाक बनवावा. 

9. आणि मग ते तळलेले चिरोटे त्यात सोडावे. 

10. एक तासानंतर वाढावे (सर्व्ह करावे)